पेट्रोलचे दर ७० पैशांनी घटले!

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 11:23

पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.

इंधन भरण्याच्या मापात पाप!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 18:25

रिक्षाची मीटर्स चेक करणारी यंत्रणा आता मापात पाप करणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न रिक्षाचालक विचारताहेत.

इंधन भेसळखोरांसमोर राज्य सरकारने टेकले गुडघे

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:35

इंधन भेसळखोरांसमोर राज्य सरकारने साफ गुडघे टेकले आहेत. भेसळ रोखण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली जीपीएस सिस्टीम निकामी करणारे जामर भेसळखोरांनी बनविल्याने ही यंत्रणाच बंद करण्याचे आदेश सरकारने दिलेत.

डिझेल दरवाढीवर एसटीची `आयडियाची` कल्पना!

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 11:48

डिझेल दरवाढीनं आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीवर तिकिटाच्या दरांत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता मात्र, या संकटावर मात करण्यासाठी एसटीनं आता एक शक्कल शोधून काढलीय.

पेट्रोल-डिझेल काढणार दिवाळं...

Last Updated: Thursday, October 25, 2012, 19:05

ऐन दिवाळी तोंडावर आली असताना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ होणार आहे. पेट्रोल प्रति लिटर ३० पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी महागणार आहे.

नाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`

Last Updated: Saturday, September 29, 2012, 08:17

नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.

ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 20:56

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

इंधन दरवाढीच्या निर्णयावर पंतप्रधान ठाम

Last Updated: Saturday, September 15, 2012, 19:19

डिझेल दरवाढीचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी समर्थन केलयं. डिझेल दरवाढ करणं गरजेचं होतं, असं पंतप्रधानांनी म्हटलंय.

इंधन दरवाढीविरोधात तापलं वातावरण...

Last Updated: Friday, September 14, 2012, 13:19

इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.

गरिबांचा प्रवासही महागणार!

Last Updated: Friday, September 14, 2012, 09:44

केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.

वाढता वाढता वाढे... इंधनाची दरवाढ

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 13:53

महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांना कर रचनेतील बदलामुळं आणखी एक दणका बसलाय. राज्यांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ झालीय. महाराष्ट्रासह सात राज्यांतील जनतेला ही दरवाढ सोसावी लागणार आहे.

मंत्र्यांची इंधनावर उधळपट्टी

Last Updated: Friday, May 25, 2012, 12:28

केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच राज्य मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल 3 कोटी 67 लाख रूपये उधळले आहेत.पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. मात्र दुस-या बाजुला जनतेचे सेवक म्हणवणारे लोकप्रतिनिधी मात्र पेट्रोल, डिझेलवर करोडो रूपये उधळत आहेत.

पेट्रोल पुन्हा भडकणार?

Last Updated: Thursday, May 17, 2012, 13:29

२२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांनी इंधन दरवाढीचे दिले संकेत

Last Updated: Saturday, April 28, 2012, 23:18

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडं संसदीय समितीनं श्रीमंत लोक वापरत असलेल्या एलपीजीवरील सबसिडी बंद करण्याची शिफारस सुचवली आहे.

अर्थमंत्री मुखर्जींनी दिले इंधन दरवाढीचे संकेत

Last Updated: Monday, March 19, 2012, 18:19

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर डिझेल तसंच गॅस (एलपीजी)च्या किंमतीत वाढ केली जाणार असल्याचे संकेत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विविध राज्य सरकार तसंच मुख्यमंत्री, राजकीय पक्षाचे नेते यांच्याशी याबाबतीत चर्चा करुन या महत्वाच्या मुद्दांवर सर्वसंमतीने निर्णय घेणार असल्याचं मुखर्जींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

'किंगफिशर एअरलाइन्स'ला दिलासा

Last Updated: Thursday, March 8, 2012, 19:57

इंधनाचा पुरवठा होऊ न शकल्याने किंगफिशर एअरलाइन्सची बुधवारी रात्रीची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. एका उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा आज सकाळी सुरळीत झाल्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सला दिलासा मिळाला.

जागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 08:57

जागतिक बाजारपेठेतून भारतीय विमान कंपन्यांना थेट इंधन खरेदी करू देण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.