Last Updated: Thursday, August 29, 2013, 14:45
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली रुपयाची ढासळलेली पत आणि अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर मौन सोडलंय. देशाच्या समोर अनेक आर्थिक प्रश्न आ वासून उभे आहेत... यासाठी अनेक अंतर्गत आणि परदेशी कारणं जबाबदार आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षानं वारंवार मागणी केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत चर्चासत्रात देशाच्या समोर मोठी आर्थिक समस्या असल्याचं म्हटलंय. यासाठी त्यांनी अनेक कारणं जबाबदार असल्याचं म्हटलंय.
‘अंतर्गत कारणांना मी नाकारत नाही, पण यासाठी विदेशी कारणंही तितक्याच प्रमाणात जबाबदार आहेत. अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा परिणामही यासाठी कारणीभूत आहे’ असं सिंग यांनी म्हटलंय.
सीरियामध्ये उपस्थित झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचाही तेल किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 14:45