Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:24
www.24taas.com, नवी दिल्लीपंतप्रधानांच्याच राजीनाम्या साठी विरोधक आक्रमक झाले असले, तरी सरकारने विरोधकांची मागणी धुडकावून लावली आहे. पंतप्रधान निवेदन देण्या चीही शक्यकता आहे. काँग्रेसच्या अंबिका सोनी यांनी पुरावे नसताना पंतप्रधानांनी राजीनामा का द्यावा? असा सवाल उपस्थित केला आहे.
काँग्रेसने यापूर्वीच कॅग अहवालावर प्रश्नसचिन्हा उपस्थित केलंय. त्या?मुळे पंतप्रधान राजीनामा देण्याची शक्यता नाही. संसदेत आज सादर झालेल्या कॅग अहवालानं धुमाकूळ घातला. संसदेत विरोधी पक्षानं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळानंतर राज्यसभा आणि लोकसभा ही संसदेची दोन्ही सभागृह स्थगित करण्यात आली होती. काहीवेळानंतर पुन्हा सभागृह सुरू करण्यात आली, मात्र पुन्हा गोंधळ सुरू झाल्याने अखेर उद्यापर्यंत सभा तहकूब करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी संसदेत मांडलेल्या कॅग अहवालात खाण घोटाळा, दिल्ली विमानतळाचा विस्तृतीकरण आणि वीज या योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा अहवाल मांडण्यात आला होता. यामध्ये खाण घोटाळ्याचा विस्तार हा टू जी घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आणि याचा ठपका पंतप्रधान कार्यालयावर ठेवण्यात आला होता.
संसदेच्या मान्सून सत्रात आलेला हा अहवाल विरोधकांसाठी एक हत्यार ठरतंय. संसदेचं हे मान्सून सत्र सात सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
First Published: Tuesday, August 21, 2012, 11:46