ट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स, PMO HAVE 5 LAKHS FOLLOWERS ON TWITTER

ट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स

ट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स
www.24taas.com, नवी दिल्ली

अवघ्या १५ महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटरवर ५ लाख फॉलोअर्स झालेत.पंतप्रधान कार्यालय प्रत्यक्षपणे जनतेशी बोलत नसले तरी त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा मॉडर्न उपाय शोधून काढला आहे.

अण्णा हजारे उपोषणाला बसण्याच्या काळात पंतप्रधान कार्यालय ट्विटरवर दाखल झाल. ‘एटपीएमओइंडिया’ या नावाने कार्यरत असलेले पंतप्रधानांच्या या ट्विटर अकाऊंटने सोमवारी पाच लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठलायं. सध्या पीएमओचे ५ लाख ५८३ फॉलोअर्स आहेत.

तर पंतप्रधान कार्यालय एकूण ३५ लोकांना आणि संघटनांना फॉलो करते ज्याच्यमध्ये ब्राझीलचे राष्ट्रपति डिलमा रोउसेफ, ब्रिक्स,योजना आयोग, सूचना आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह, उमर अब्दुल्ला, सूचना आणि प्रसारणमंत्रालय, शशि थरूर, मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद नजीब तुन रज्जाक, संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून, डेविड कैमरन आणि रूसचे प्रधानमंत्री दमित्री मेदवेदेव यांचा समावेश होतो.

सगळ्य़ात आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे ट्विटरवर सर्वात जास्त लोकप्रिय असणारे बराक ओबामांचा यामध्ये समावेश नाही. पंतप्रधान कार्यालयाच्या फॉलोवर्सच्या लीस्टमध्ये अनेक सेलिब्रीटी,सामान्य जनता आणि पत्रकारांचा सामावेश आहे.

First Published: Tuesday, April 9, 2013, 18:14


comments powered by Disqus