Last Updated: Saturday, December 1, 2012, 21:11
www.24taas.com, नाशिकभ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटवून घराघरात पोहचलेल्या अरविंद केजरीवाल यांनाही राजकारणाचा मोह आवरता आला नाही. राजकारणात प्रवेश केल्या केल्या केल्या इतर राजकीय पक्षांप्रमाणे वाद्ची परंपरा आम आदमी पार्टीनेही कायम ठेवली असून पार्टीचे काम सुरु होण्याआधीच तक्रार दाखल झाल्यानं पक्षातर्फे काय भूमिका मांडली जाते आणि सरकार काय कारवाई करतं याकडे देशवासीयांच लक्ष लागलंय.
आम आदमी पार्टीच्या नावाने राजकारणात प्रवेश करणा-या अरविंद केजरीवाल,शांती भूषण यांच्याविरोधात नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलीय. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आणि पक्षासाठी तिरंग्याचा वापर केल्यामुळे नाशिकच्या सामजिक कार्यकर्त्याने तक्रार केली आहे.
२६ नोव्हेंबरच्या पहिल्या मेळाव्यात व्यासपीठावर तिरंग्याचे होर्डिंग लावण्यात आले होते. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केल्यानं चौकशी करून संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय.
First Published: Saturday, December 1, 2012, 21:08