Last Updated: Friday, March 15, 2013, 16:11
www.24taas.com, जम्मू लखपत जेलमध्ये हत्या झालेल्या भारतीय कैदी चमेल सिंह याचं शव भारताकडे सोपवलं गेलंय. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. पुन्हा एकदा जगासमोर पाकचा खरा आणि क्रूर चेहरा समोर आलाय.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार पाकिस्तानातील कोट लखपत जेलमध्ये हत्या झालेल्या चमेल सिंह याच्या शरीरातील सगळे महत्त्वाचे अंग काढून घेण्यात आलेत. चमेल सिंहचं मृत शरीर भारताच्या ताब्यात आल्यानंतर पोस्टमॉर्टेम करण्यात आलंय. यामुळे हा खुलासा होऊ शकलाय. १३ मार्च रोजी पाकिस्ताननं भारतीय कैदी चमेल सिंह याचा मृतदेह अटारी सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं.
जम्मू जिल्ह्याचा रहिवासी असलेला चमेह सिंह याची जानेवारीमध्ये लाहोरमधील कोट लखपत जेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टेम करताना, चमेल सिंहच्या मृतदेहातून हृदय, किडनी, लिव्हरसारखे महत्त्वाचे अंग गायब होते. त्यामुळे चमेल सिंहचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
चमेल सिंह २००८ मध्ये चुकून सीमेपार पाकिस्तान हद्दीत झाला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पाच वर्षांच्या कारावासाची सजा सुनावण्यात आली होती. याच दरम्यान, सजा भोगत असलेल्या ४० वर्षीय चमेल सिंहचा मृत्यू झाला. जेल अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.
First Published: Friday, March 15, 2013, 16:11