Last Updated: Saturday, January 12, 2013, 19:44
www.24taas.com, इस्लामाबाद
हाफिज सईदने काश्मिरमध्ये हल्ला करण्याचा डाव रचला आहे. यासाठी तो पाकिस्तानी सेनेचीही मदत घेत असल्याचे समजते. मिलिट्री इंटेलिजन्स ब्युरो (एमआयबी) ला पाकिस्तानी सेनेच्या संदेश इंटरसेप्टवरुन याची माहिती मिळाली आहे. या संदेशात म्हटले गेले आहे की, 2013 या वर्षात भारतात प्रवेश मिळवायचा आहे आणि 2014 मध्ये जिहाद करायचे आहे.
यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. या कारवाया थांबल्या नाहीत तर येत्या काळात काश्मिरात आणखी तणाव वाढू शकतो . त्याची किंमत भारताला मोजावी लागेल , अशी धमकीच हाफिजने दिली आहे. नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावात भरच पडलीय.
आता, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईदनं भारताला धमकीचा संदेश पाठवून त्यात आणखी भर घातलीय. ‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.
First Published: Saturday, January 12, 2013, 19:35