Last Updated: Thursday, November 15, 2012, 10:37
www.24taas.com,नवी दिल्लीराष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा मुंबई दौरा रद्द झालाय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौ-यावर येणार होते. पण त्यांनी त्यांचा दौरा रद्द केलाय. राष्ट्रपती भवनच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत आज सायंकाळी जमनालाल बजाज पुरस्कार वितरण समारंभ होणार होता. तर शुक्रवारी अहमदनगरमधील प्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील साई आश्रमाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी राष्ट्रपती दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार होते.
दरम्यान, राष्ट्रपतींचा दौरा का रद्द करण्यात आला, याचे कारण सांगण्यात आलेले नाही.
First Published: Thursday, November 15, 2012, 09:46