खाद्य सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 13:57

गरिबांना कमी दराने धान्य मिळावे यासाठी केंद्रातील युपीए सरकारने खाद्य सुरक्षा विधेयक आणलेय. मात्र, या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. लोकसभेत या विधेयकावर म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. हे विधेयक लोकहिताचे नसल्याचे सांगून विरोधकांनी ते मागे घेण्याची मागणी केली. मात्र, केंद्रातील सरकारने अध्यादेश काढून विधेयक मांडले. या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने त्याचा मार्ग मोकळा झालाय.

राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा रद्द

Last Updated: Thursday, November 15, 2012, 10:37

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा मुंबई दौरा रद्द झालाय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौ-यावर येणार होते. पण त्यांनी त्यांचा दौरा रद्द केलाय. राष्ट्रपती भवनच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.

प्रणव मुखर्जींच्या उमेदवारीला संगमांचा आक्षेप

Last Updated: Monday, July 2, 2012, 16:37

प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पी. ए. संगमा यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र त्यावर सांख्यिकी संस्थेनं खुलासा दिला आहे. प्रणव मुखर्जी यांच्याकडे लाभाचे पद असल्याची तक्रार राज्यसभा सचिवालयात करण्यात आली आहे.