दर्डांवर राजीनाम्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून दबाव, pressure on darda for resignation

शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा देणार राजीनामा

शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा देणार राजीनामा
www.24taas.com, नवी दिल्ली
कोळसा खाण घोटाळाप्रकरण आता दर्डा कुटुंबीयांना भोवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं सूत्रांकडून समजतंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोळसा खाण घोटाळ्यात चहूबाजूंकडून घेरले गेलेले शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उद्या म्हणजेच गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज शिक्षक दिन असल्यामुळे शिक्षणमंत्री यांना एका दिवसाची मुदतवाढ मिळालीय असंच म्हणावं लागेल. काँग्रेस श्रेष्ठींकडून दर्डांना राजीनाम्याची मागणी केली गेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दर्डांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. कोळसा खाण घोटाळ्यात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि त्यांचे बंधू खासदार विजय दर्डा सध्या अडचणीत सापडलेत. सीबीआयनं या घोटाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडींनंतर ५ कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल केलेत.

दरम्यान, राजेंद्र दर्डा यांचा घोटाळा आता उघड झालाय त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलीय.

First Published: Wednesday, September 5, 2012, 16:32


comments powered by Disqus