कोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स

Last Updated: Thursday, May 8, 2014, 17:47

कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.

विजय दर्डांची खासदारकी, जाहिरातींची दिवाळी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 09:44

खासदार विजय दर्डांसंदर्भात अतिशय खळबळजक बातमी. झी 24 तासचा सगळ्यात मोठा खुलासा, विजय दर्डांसंदर्भातला. समाजसेवेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी खासदारकीच्या लेटरहेडचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दर्डा यांनी केला आहे.

शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा देणार राजीनामा

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 16:46

कोळसा खाण घोटाळाप्रकरण आता दर्डा कुटुंबीयांना भोवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं सूत्रांकडून समजतंय.

दर्डांच्या कंपन्यांवर छापे

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 08:33

कोळसाकांडावरून संसदेचं कामकाज ठप्प असताना सीबीआयनं कोळसा खाण कंपन्यांच्या कार्यालयांवर ठिकठिकाणी छापे टाकले. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्या काँग्रेस खासदार विजय दर्डांच्या कंपन्यांवर छापे टाकल्यानं खळबळ उडालीय.

दर्डा कंपनीवर एफआयआर

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 23:07

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी काँग्रेस खासदार विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडसह पाच कंपन्यांवर छापे टाकल्यानंतर सीबीआयनं संध्याकाळी एफआयआर दाखल केला.

दर्डांनी उधळली मोदींवर स्तुतिसुमनं...

Last Updated: Sunday, July 29, 2012, 14:44

‘मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे गुजरातचे सिंह आहेत’, अशी स्तुतीसुमनं काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी उधळलीत. काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींची प्रशंका ऐकायला मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

Last Updated: Saturday, February 4, 2012, 12:11

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.

पतंगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर

Last Updated: Friday, November 4, 2011, 10:38

शिक्षण संस्थेमध्ये भरीव काम करणारे पंतगराव कदम यांनी शिक्षण खात्याच्या कारभाराला वैतागून, काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. 'शिक्षण खात्याचा कारभार दिशाहीन असून शिक्षण खाते एकतर बंद करा, नाहीतर कोणाला तरी चालवायला द्या'.