पुजाऱ्याने केली उकळत्या दुधाने अंघोळ Priest baths with boiling milk

पुजाऱ्याने केली उकळत्या दुधाने अंघोळ

पुजाऱ्याने केली उकळत्या दुधाने अंघोळ
www.24taas.com, चंदौली

उत्तर प्रदेशातील चंदौली येथील नारायणपूर गावात मंगळवारी दुपारी एका पुजाऱ्याने उकळत्या दुधाने अंघोळ केली. यानंतर संध्याकाळ होताच या पुजाऱ्याने अग्निकुंडात आपलं डोकं घातलं.

नवरात्रीच्या पुजेच्या वेळी उत्तर प्रदेशचे राज्य परिवहन मंत्री दुर्गा प्रसाद यादव यांच्या उपस्थितीत एक भयावह धार्मिक अनुष्ठान झालं. यामध्ये एका पुजाऱ्याने उकळत्या दुधाने अंघोळ केली. हा प्रकार पाहून उपस्थित थक्क झाले.



अग्निकुंडात आपलं डोकं घालणाऱ्या या पुजाऱ्याने सरकारी अधिकाऱ्यांसमोर श्रद्देच्या नावाखाली लहान बालकांना उकळत्या दुधाने अंघोळ घातली. लहान मुलांना चटके असह्य होत असतानाही त्यांना अंघोळ घालणं चालूच राहिलं एकही सरकारी अधिकारी या मुलांच्या बचावासाठी पुढे आला नाही.

First Published: Wednesday, April 17, 2013, 16:29


comments powered by Disqus