भोंदूबाबाचा मुलीला जाळण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, February 28, 2014, 11:56

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार एका भोंदूबाबाने केल्याचे उघड झाले आहे.

‘पन्नास पेट्या पाठव नाहीतर, उडवून देईन’

Last Updated: Thursday, December 19, 2013, 17:16

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढल्याचे बुधवारी दुपारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातून समोर आले आहे. ‘पन्नास पेट्या (५० लाख) सांगतो त्या ठिकाणी आणून दे, नाही तर २५ गाड्या लावून उडवून देईन’ अशी धमकी रवी पुजारीनं एका बिल्डरला दिलीय. त्यामुळे, कल्याण-डोंबिवलीमधील बिल्डर लॉबीत एकच खळबळ उडालीय.

तुळजापूर मंदिरात तोतया पुजाऱ्यांकडून भक्तांची लूट

Last Updated: Thursday, May 9, 2013, 18:51

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात तोतया पुजा-यांकडून भाविकांची लूट आणि फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पुजाऱ्याने केली उकळत्या दुधाने अंघोळ

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:29

उत्तर प्रदेशातील चंदौली येथील नारायणपूर गावात मंगळवारी दुपारी एका पुजाऱ्याने उकळत्या दुधाने अंघोळ केली. यानंतर संध्याकाळ होताच या पुजाऱ्याने अग्निकुंडात आपलं डोकं घातलं.

पुजाऱ्याची करणी; महिलेवर बलात्कार करून विकलं

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 09:39

मध्यप्रदेशातील एका मंदिरातील पुजाऱ्यानं एका ३३ वर्षीय महिलेला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय.

आता महिला पुरोहित

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 07:42

नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणा-या गुरुंजीऐवजी आता लख्ख नऊवारी सोवळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. यंदा गणेश चतुर्थीला हे पुणे-डोंबिवलीत सर्रासपणे दिसण्याची शक्यता आहे.

पंढरपुरच्या मंदिरावर बडव्यांचा कब्जा- अण्णा डांगे

Last Updated: Monday, September 10, 2012, 20:27

पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर बडवे आणि उत्पातांचा कब्जा आहे. या मंदिरातील अधिकचं उत्पन्न बडव्याकडे जाते, त्यामुळे विकासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केला आहे. सांगलीमध्ये डांगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लहानग्या हिटलरला फादरने वाचवलं होतं?

Last Updated: Friday, January 6, 2012, 21:52

जर्मनीत १८९४ साली इन नदीच्या बर्फाने गोठलेल्या पात्रात एका चार वर्षाच्या मुलाला एका फादरने वाचवलं होतं तो अडोल्फ हिटलर असण्याची शक्यता आता इतिहासकारांनी व्यक्त केली आहे. एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार १८९४ सालच्या जानेवारी महिन्यात एका लहान मुलाला नदीतून बुडताना वाचवण्यात आलं होतं आणि त्यासंबंधीचे पुरावे दप्तरात उपलब्ध आहेत.