Last Updated: Monday, February 10, 2014, 13:38
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेला आगामी निवडणुका लढविण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
निखिलेश पांडे यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापासून टोल विरोधी पवित्रा घेतला असून त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे तोडफोड होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत आहे. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुका लढविण्याची परवानगी देऊ नये आणि त्यांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, या याचिकेवरील पहिली सुनावणी येत्या सोमवारी होणार असून अशा प्रकारची मागणी किंवा याचिकेवर सुनावणी करण्यात यावी का या संदर्भात निर्णय या सुनावणीत होणार आहे. त्यानंतर या याचिकेचे भविष्य ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 10, 2014, 13:19