raging on student, 24taas.com

अल्पवयीन मुलांवर अमानुष रॅगिंग

अल्पवयीन मुलांवर अमानुष रॅगिंग
www.24taas.com, मिदनापूर

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अमानुषपणे रॅगिंग करण्यात आली आहे. सालबोनी शाळेतील तीर्थदीप मल या विद्यार्थ्याची हॉस्‍टेलमध्ये रॅगिंग करण्यात आली.

सोळा ऑगस्ट रोजी सीनियर विद्यार्थ्यांनी तीर्थदीपच्या अंगावरील कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली, एवढेच नाही तर त्याच्या पोटावर ब्लेडने अनेक वार करण्यात आले.

त्याच्यावर एवढे अत्याचार केल्यानंतर रात्रभर त्याला त्याच अवस्थेत डांबून ठेवण्यात आले. रॅगिंग केल्यानंतर सीनियर विद्यार्थ्यांनी त्याला धमकीही दिली होती.

First Published: Monday, August 20, 2012, 22:20


comments powered by Disqus