‘राहुल अविवाहीत राहिलेत, घराणेशाही...,Rahul Gandhi didn`t marry to prevent `dynastic rule`, says Congress leader

‘राहुल गांधीं अविवाहीत राहिलेत, घराणेशाही रोखण्यासाठी’

‘राहुल गांधीं अविवाहीत राहिलेत, घराणेशाही रोखण्यासाठी’
www.24taas.com,झी मीडीया, मुंबई

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी लग्न का केलं नाही, असा तुमच्या मनात प्रश्न असेल तर! याचे उत्तर काँग्रेसच्या नेत्यानेच दिले आहे. राहुल गांधी अविवाहीत राहिलेत आहेत, कारण त्यांना आपली घराणेशाही पुढे न्यायची नाही. घराणेशाही रोखण्यासाठी राहुलनी हे पाऊल उचल्याचे अजब वक्तव्य अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव शिवराज वाल्मिकी यांनी केले आहे.

लग्न न करण्याचा राहुल गांधींचा क्रांतीकारक निर्णय आहे. लग्न केले तर वंश वाढेल. त्यामुळे पुन्हा गांधी घराणेशाही पुढे येईल. राहुलना घराणेशाही पुढे न्यायची नाही. घराणेशाहीला राहुल यांचा आधीपासूनच विरोध आहे. त्यामुळेच राहुलनी हा निर्णय घेतल्याचे वाल्मिकी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

शिवराज वाल्मिकी काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. वाल्मिकी यांनी असं वक्तव्य करुन वाद निर्माण केला, मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी माफीही मागितली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 10:29


comments powered by Disqus