Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:29
www.24taas.com, झी मीडिया,अलाहाबाद गरिबी ही निव्वळ मानसिक स्थिती असून आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला गरिबी हटवता येऊ शकते असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय. त्यांच्या या विधानाने गरीबांची थट्टा केल्याचे म्हटले जात आहे.
अलाहाबाद इथे महिलांच्या स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. इतकच नाही तर जेवणासारख्या भौतिक गोष्टीशी गरिबीचा काही संबंध नाही. नागरिक जोपर्यंत स्वतःमधील आत्मविश्वास जागवणार नाहीत, तोपर्यंत ते गरिबीतून बाहेर पडणार नाहीत. सरकार गरिबांसाठी अनेक प्रयत्न करते. मात्र फक्त जेवण आणि पैसा दिल्याने गरिबीतून बाहेर पडू शकणार नाही, असं त्यांनी म्हटलयं.
गरिबीतून बाहेर पडण्यासाठी केवळ पैसे देवून चालणार नाही. पैसे दिले म्हणजे लोक गरिबीतून बाहेर पडतील, असे नाही. त्यासाठी त्यांचा आत्मविश्वास महत्वाचा आहे, असे राहुल यांनी म्हटले. दरम्या, काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी मुंबई १२ रूपयांत तर फारूख अब्दुला यांनी १ रूपयामध्ये भोटभर जेवू शकतो असे धक्कादाय विधान केले होते. आता राहुल यांनी गरिबीवर मिठ चोळण्याचे काम केलेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 7, 2013, 10:21