महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ Rail passenger fare hiked by 14.2%

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ
www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली

रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.

त्यामुळं आता सामान्यांसाठी अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न पुन्हा विचारला जातोय. कारण रेल्वेच्या भाडेवाढीचा `बॉम्ब` आज देशभरातील रेल्वे प्रवाशांवर टाकण्यात आला आहे. प्रवासी भाड्यात १४.२ तर माल भाड्यात ६.५ टक्के एवढी मोठी वाढ करण्यात आली असून 25 जूनपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

रेल्वे भाडेवाढीचे वृत्त `पीटीआय` या वृत्तसंस्थेनं दिलं असून रेल्वे अर्थसंकल्पाच्या आधीच झालेली ही भाडेवाढ म्हणजे लाखो प्रवाशांसाठी महागाईच्या आगीत तेल ओतणारीच ठरणार आहे.

रेल्वे भाडेवाढनंतर आता कसे असतील तिकिट दर

1. नवी दिल्ली ते मुंबई प्रवास

स्लिपर क्लास : आधीचं तिकीट हे 555 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 632 रुपयांवर पोहचलंय.

थर्ड ए.सी. : आधीचं तिकीट हे 1815 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 2073 रुपयांवर पोहचलंय.

सेकंड ए.सी. : आधीचं तिकीट हे 2495 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 2849 रुपयांवर पोहचलंय.

फर्स्ट ए.सी. : आधीचं तिकीट हे 4136 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 4723 रुपयांवर पोहचलंय.

2. मुंबई ते पुणे प्रवास :

सिटींग : आधीचं तिकीट हे 95 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 119 रुपयांवर पोहचलंय.

चेअर कार : आधीचं तिकीट हे 335 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 383 रुपयांवर पोहचलंय.

3. मुंबई ते नागपूर प्रवास :

स्लिपर क्लास : आधीचं तिकीट हे 500 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 571 रुपयांवर पोहचलंय.

थर्ड ए.सी. : आधीचं तिकीट हे 1165 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 1330 रुपयांवर पोहचलंय.

सेकंड ए.सी. : आधीचं तिकीट हे 1640 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 1873 रुपयांवर पोहचलंय.

फर्स्ट ए.सी. : आधीचं तिकीट हे 2795 रुपये एवढं आहे. तेच तिकीट आता दरवाढीनंतर आता 3199 रुपयांवर पोहचलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 20, 2014, 17:48


comments powered by Disqus