Last Updated: Tuesday, August 20, 2013, 08:30
www.24taas.com , झी मीडिया, पाटनाबिहारमधील सहरसा जवळील धमारा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली येऊन भीषण अपघातात ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
सहरसा इथून पाटणाकडं जात असलेल्या ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली सापडून नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं जखमींपर्यंत वेळेत मदतही पोचविता येत नव्हती. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनाच मारहाण केली.
श्रावण महिन्याच्या सोमवारी कात्यायिनी देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. हे प्रवासी धमहारा हॉल्टच्या रेल्वे रुळावर उभे होते आणि रेल्वे येण्याची वाट पाहत होते.
पाटनापासून सहरसापर्यंत जाणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचा इथं बहरसाला स्टॉप नसतो. मात्र गाडी पकडण्यासाठी प्रवासी रेल्वेट्रॅकवर उभे होते. तिथं उपस्थित इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासी ट्रॅकवर उभे होते. राज्यराणी एक्स्प्रेस तिथून पास झाली, ती प्रवाशांना चिरडतच.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 19, 2013, 10:53