Last Updated: Monday, October 29, 2012, 09:45
www.24taas.com, मुंबईआयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत ही बेधडक विधानं करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. यावेळी राखी सावंत सिनेक्षेत्रातली व्यक्ती सोडून चक्क अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. राखी सावंतने केजरीवालांना चक्क भगोडा (पळपुटा) म्हणत त्यांचा अपमान केलाय.
केजरीवाल यांच्याबद्दल बोलताना राखी म्हणाली, “मला राजकारणातलं काही कळत नाही. मी एक कलाकार आहे. मात्र त्याही आधी मी या देशाची नागरिक आहे. म्हणून मी देशवासियांना सांगू इच्छिते, की केजरीवाल हे भगोडे (पळपुटे) आहेत. त्यांनी देशाला वैताग आणलाय. ज्यादिवशी रामलीला मैदानावर अण्णा हजारेंच्या उपोषणाला केजरीवाल बसले होते, तेव्हाच मी हे ओळखलं होतं आणि लोकांना सांगत होते. माझ्या मनात अण्णांबद्दल पूर्ण आदर आहे. मी किरण बेदींचाही खूप आदर करते. पण मला केजरीवालांवर कधीच विश्वास नव्हता. लोकपाल बिलासाठी लढणाऱ्या केजरीवालांचं पाहा आता काय चाललं आहे.”
राखी म्हणाली, “केजरीवाल भ्रष्टाचाराविरोधात लढत नसून ते प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी हे करत आहेत. दसऱ्याला रावण जाळल्यावर केजरीवाल पुन्हा रावण जन्माला घालत आहेत. केजरीवाल स्वतः कधीच कुठल्या गावात दौऱ्यासाठी गेले नाहीत, मग ते काय देशासाठी करणार? केजरीवाल यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे. केजरीवाल हे वेगवेगळ्या नेत्यांची पोल खोल करत असतात. पण त्यांची पोल खोल कोण करणार? मी, या देशाची मुलगी राखी सावंत करेन त्यांची पोल खोल. केजरीवालांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. भारतीयांनी त्यांना देशातू हाकलण्यापूर्वी केजरीवालांनी योग्य ती भूमिका घ्यावी.”
First Published: Monday, October 29, 2012, 09:45