Last Updated: Friday, October 26, 2012, 14:00
www.24taas.com, नवी दिल्लीहॉट आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच आपल्या प्रतापाने चर्चेत राहणारी आता नव्याच फंद्यात पडली आहे. राखी सावंतची नजर आता ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर पडली आहे. त्यामुळे आता केजरीवाल याचं नक्की काय होणार हा प्रश्न त्यांना स्वत:ला देखील नक्कीच पडला असणार. ड्रामाक्विन राखी सावंत ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे नेते अरविंद केजरीवाल यांची चांगलीच परिक्षा घेणार आहे.
बॉलिवूडमध्ये आपली खिचडी शिजत नसल्याने आयटम गर्लने आपली नजर भष्ट्रचारी नेत्यांवर आरोप करणाऱ्या केजरीवालांकडे रोखली आहे. रावण दहनाच्या कार्यक्रमानंतर राखीने दिल्लीत भष्ट्राचारीविरोधी चळवळ करत असलेल्या केजरीवालांना भेटण्याचं आव्हानं केल होतं. जर माझी भेट केजरीवालांनी नाकारली आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर मी कुठला तरी दुसरा मार्ग स्विकारेन असं म्हणत राखीने केजरीवालांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
आणि राखी सावतंच्या बोलण्याची धार कशी आहे हे चांगलचं ठाऊक आहे. राखीनं पुढे असंही म्हटलंय की केजरीवाल तर माझे फॅन आहेत, मला टि.व्ही वर पाहून तर ते बोलायला शिकले आहेत, जर त्यांनी माझ्या भेटीला योग्य तो प्रतिसाद नाही दिला तर मी प्रसारमाध्यातून केजरीवालांवर प्रश्नांचा भडिमार करेनं. ज्या राजकिय व्यक्तींवर ते टिका करत आहेत त्याच्याविरोधात पुरावा सादर करा आणि कोर्टात खटला दाखल करा.
त्यांना आपल्या न्यायव्यवस्थेवर निष्ठा नाहीय का? चुकीची परिस्थिती निर्माण करून उगागच जनतेची दिशाभूल का करायची? केजरीवालांना नुस्त्या दुसऱ्यांवर टिका करूनचं प्रसिध्दी मिळवायची आहे का? असंही राखीनं केजरीवालांना ठणकावून विचारलंय. केजरीवालांसाठी अशा बऱ्याच प्रश्नांची यादी राखी सावंतकडे आहे.
First Published: Friday, October 26, 2012, 13:51