Last Updated: Friday, August 24, 2012, 19:58
www.24taas.com, नवी दिल्लीमहायुतीत मनसे आल्यास, इतरांना वाटतो तितका फायदा होणार नाही, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलंय. मनसेला सध्या जेवढी मते मिळतात, तितकी मते महायुतीत आल्यावर त्यांना मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच इंदू मिलची जागा मागतोय कोहिनूर मिलची नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
नाशिकमध्ये दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतल्या जाहीर सभेत इंदू मिल आणि दलित नेत्यांसंदर्भात काढलेल्या उद्गाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान,शिवाजी रोडवरच्या आंबेडकर पुतळ्याजवळ दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला. राज ठाकरेंनी दलित नेत्यांची माफी मागावी आणि राज्य सरकारनं राज यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आंदोलकांनी केली.
First Published: Friday, August 24, 2012, 19:58