ramdev baba in parliament , 24taas.com

काँग्रेस हटवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा - रामदेव

काँग्रेस हटवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा - रामदेव
www.24taas.com

बाबा रामदेव सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. रामलीला मैदानावरच्या आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्यामुळं आता संसदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस हटवा, देश वाचवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा अशी घोषणा त्यांनी रामलीला मैदानावर केली.

आज तेरा तारीख असून ही सरकारच्या तेराव्याची सुरूवात असल्याचंही बाबा रामदेव म्हणाले. बाबांच्या या घोषणेमुळं रामलीला मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून संसदेकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

तसंच १० आरएएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्याही बंदोबस्तासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता अण्णांनंतर रामदेव बाबा यांनी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत.

First Published: Monday, August 13, 2012, 10:57


comments powered by Disqus