Last Updated: Tuesday, August 21, 2012, 16:04
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्च्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन मरीन ड्राइव्हपासून मोर्च्यात सामील झाले आहेत. आता ते आझाद मैदानापर्यंत ते पायी मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. सध्या राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले असून थोड्याच वेळात बाषणाला सुरूवात करणार आहेत.
यापूर्वी राज ठाकरे गिरगाव दुपारी १३० मिनिटांनी चौपाटीकडे रवाना झाले आहेत. गिरगाव चौपाटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला जाब विचारणार आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशीच मागणी मनसेने केली आहे.