संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं- रामदेवबाबा Ramdev tells sages to maintain distance from women

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं- रामदेवबाबा

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं- रामदेवबाबा
www.24taas.com , झी मीडिया, हरिद्वार

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबांनी दिलाय. आई-मुलगी, सासू यांच्यासारख्या कुटुंबातल्या महिलांपासूनही दूर राहावं, असं रामदेवबाबा म्हणाले.

धर्मग्रथांनुसार संतांसाठीचं आदर्श वर्तनाबाबत काही सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यात महिलांपासून दूर राहावं, असंही म्हटलंय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंच्या संदर्भावरुन रामदेवबाबांनी ही प्रतिक्रिया दिली.

जर कोणत्या धर्मगुरूनी आपल्या वर्तनानं थोर तत्त्वांचं उल्लंघन केलं असेल तर त्याला संकटाचा सामना करावाच लागेल, अशी टीका आसाराम बापूंचं नाव न घेता रामदेवबाबांनी केलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 10:22


comments powered by Disqus