आसाराम बापूंची आता सूरत पोलिसांकडून चौकशी

Last Updated: Monday, October 14, 2013, 16:56

सूरतमध्ये दोन बहिणींनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळं आता आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साईंवरील संकट वाढतांना दिसतायेत. गुजरात पोलिसांनी आज आसाराम बापूंची जोधपूरहून अहमदाबादला रवानगी केलीय. आता अहमदाबादमध्ये पोलीस बापूंची चौकशी करेल.

आसाराम बापूंवर बॉलिवूड फिदा!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:43

सध्या अटकेत असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंवर बॉलिवूड फिदा झालंय. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांचा आसाराम बापू आवडता विषय बनलेत. नुकताच प्रकाश झा यांनी आसाराम बापूंवर आधारित ‘सत्संग’ चित्रपटाची घोषणा केलीय. तर आता आसाराम यांच्यावर आणखी एक चित्रपट येणार असल्याचं कळतंय. चित्रपटाचं नाव आहे ‘चल गुरू हो जा शुरू’…

आसाराम बापू शुद्ध चारित्र्याचे- नारायण साई

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 16:04

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंची पाठराखण त्यांचा मुलगा नारायण साईनं केलीय. आसाराम बापूंचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याविषयी संपूर्ण जनतेलाही लवकरच खरं ते कळेल असं साई म्हणाले.

‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 14:57

आसाराम बापूंचं वकिलपत्र घेतलेल्या राम जेठमलानी यांनी या केसला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. आसाराम बापूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असा दावा राम जेठमलानी यांनी कोर्टात केलाय.

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं- रामदेवबाबा

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:22

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबांनी दिलाय. आई-मुलगी, सासू यांच्यासारख्या कुटुंबातल्या महिलांपासूनही दूर राहावं, असं रामदेवबाबा म्हणाले.

असा कसा हा `आसाराम`?

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 09:28

आसाराम बापू आणि वाद हे जुनंच समिकरण आहे. कधी नेते-अधिकाऱ्यांना धमक्या दे, आपल्या भक्तांना लाथा-बुक्क्यांनी मार असली कृत्य आसाराम नेहमीच करत असतात. दुष्काळ असताना पाण्याची नासाडी करून वर त्याचं समर्थनही करतात.जिच्यावर बलात्कार झाला, तिचीच चूक आहे, असा संतापजनक दावाही त्यांनी केलाय.