Last Updated: Tuesday, September 25, 2012, 16:56
www.24taas.com, जबलपूर महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. विजयनगरमधील बांधकाम सुरु असलेल्या एका भवनाच्या इमारतीत काल रात्री उशीरा एका २२ वर्षीय कॉलेज युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शिक्षणासाठी आलेली ही युवती आपल्या आजी-आजोबाकडे राहत होती. मात्र काल रात्री ती बांधकाम सुरु असलेल्या भवनात हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यावेळी तिच्या अंगावर कपडे तर नव्हतेच पण काही नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे दिसून आले.
तिचे तोंडही बांधण्यात आले होते. मात्र काही वेळानंतर तिचा किंचाळण्याचा आवाज सुरक्षा रक्षकाला गेल्यानंतर त्याला संबंधित युवती दिसून आली. त्यानंतर तेथे जवळ असलेल्या स्टेट बॅंकेच्या सुरक्षारक्षकाला माहिती दिली व पोलिसांना फोन केला.
First Published: Tuesday, September 25, 2012, 16:56