Last Updated: Monday, April 21, 2014, 10:57
www.24taas.com, झी मीडिया, गाजियाबाद पैसे उधार घेतल्याने एका महिलेवर सतत बलात्कार करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये घडली आहे. गाजियाबादमधील एका निवृत्त सैनिकाने शेजारी राहत असलेल्या एका महिलेवर सतत अडीच वर्ष बलात्कार केला आहे. या घटनेची पीडित महिलेने विजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
साधारण अडीच वर्षापूर्वी या महिलेने शेजारी राहत असलेल्या सेवानिवृत्त सैनिकाकडून पैसे उधार घेतले. काही दिवसाने सैनिकाकडून उधार पैशांची मागणी होऊ लागली. यासाठी सैनिक महिलेच्या घरी जाऊ लागला. तसेच घरातच तिच्यावर बलात्कार करु लागला.
हा घडलेला प्रकार महिलेने तब्बल अडीच वर्षानंतर विजयनगर पोलीस ठाण्यात पोलीसांसमोर मांडला. आपल्यावर सतत अडीच वर्ष निवृत्त सैनिकाने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला. महिलेच्या आरोपावरुन निवृत्त सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 10:57