Last Updated: Saturday, April 26, 2014, 15:56
www.24taas.com, झी मीडिया, राजस्थान राजस्थानमध्ये एक घृणास्पद घटना समोर आली आहे. बुंदी जिल्ह्यातील राहीन या गावात एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेवर शाळेतील मुलांनीच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. शिक्षेकेचे वय २८ वर्ष आहे. शाळेत शिकविण्यासाठी आल्यानंतर वर्गातील चार विद्यार्थ्यांनी वर्गातच शिक्षिकेवर अतीप्रसंग केला.
बलात्कारानंतर चौघे आरोपी फरार झाले. शिक्षिकेने या प्रकारणानंतर तडक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आलीय तर एक आरोपी अजून फरार आहे.
पोलीस अधीक्षक पंकज चौधरींच्या माहितीनुसार,`दयाराम, छोटू सिंह आणि हरी सिंह या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून बाबूलाल हा फरार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, April 26, 2014, 15:53