Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:55
ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.