Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:36
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबादगुजरात दंगलीच्या मुद्यांवर नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याची अमेरिकीची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल आज गांधीनगरमध्ये मोदींना भेटणार आहेत.
या भेटीत लोकसभा निवडणूक आणि देशाच्या प्रगतीबाबत मोदींचे विचार जाणून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र प्रत्यक्षात या भेटीत मोदींच्या व्हिसा मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चाय पे चर्चा हा मोदींना प्रमोट करणारा कार्यक्रम देशात तीनशे शहरात एक हजार ठिकाणी एकाच वेळी राबवण्यात आला. मुंबईत बोरीवली पश्चिमेलाही दोन ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. रहदारीच्या ठिकाणी आणि रस्त्याच्या बाजूला दोन एलसीडी आणि स्पीकरच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोदींची फिल्म दाखवली गेली.
चहाचे झुरके घेत अनेकांनी ही फिल्म पाहिली. यात देशाच्या एकात्मतेचा आणि विकासाचा संदेश देण्यात आला. यापुढेही अशा कार्यक्रमातून मोदींचं प्रमोशन करण्यात येणार आहे. मोदींना पाठिंबा देणा-या सामान्य मतदारांकडून हे प्रमोशन करण्यात येतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 08:36