गुजरात दंगलीबाबत आपल्याला दु:ख - नरेंद्र मोदी

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 09:03

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत आपल्याला दु:ख आहे,मात्र अपराधीभाव नाही, असं एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटंलय.

नरेंद्र मोदींबाबत अमेरिकेचे एक पाऊल मागे?

Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:36

गुजरात दंगलीच्या मुद्यांवर नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याची अमेरिकीची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल आज गांधीनगरमध्ये मोदींना भेटणार आहेत.

गुजरात दंगल मुक्त, नरेंद्र मोदींची घोषणा

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:45

गुजरात राज्य दंगामुक्त झाल्याचा दावा, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आहे. गुजरातमध्ये दहावर्षांपूर्वी प्रत्येक दिवशी दंगा होत होता. मात्र आता गुजरातमधील लोक मिळून मिसळून रहायला लागले आहेत.

राष्ट्रवादीकडूनही नरेंद्र मोदींना क्लिनचीट

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 18:18

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात दंगली प्रकरणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मत मांडलं आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे, आपण कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.

मी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 11:11

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.

गुजरात दंगली प्रकरणी मोदींना माफी मागायची गरज नाही- सलमान

Last Updated: Monday, January 20, 2014, 11:22

बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.

मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसची जोरदार टीका

Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:16

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसनंही टीका केलीय. मोदींनी मुस्लीमांची केलेली तुलना निंदनीय असून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. यातून त्यांची मानसिक विकृती दिसत असल्याचीही टीका काँग्रेसनं केलीय. तर मोदींचे मानसिक संतुलन बिघडल्याची जहरी टीका जेडीयूनं केलीय.

हो, मी हिंदू राष्ट्रवादी- नरेंद्र मोदी

Last Updated: Friday, July 12, 2013, 18:14

मी जन्माने राष्ट्रवादी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी होणे काही गुन्हा नाही, असे रोखठोक मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मोदींची मुलाखत सिद्दीकींना पडली महागात

Last Updated: Saturday, July 28, 2012, 15:05

समाजवादी पार्टीचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी यांना नरेंद्र मोदींची मुलाखत घेणं चांगलच महागत पडल्याचं दिसतंय. सपानं सिद्दीकी यांची हकालपट्टी केलीये.

मोदी म्हणतात; दोषी असेन तर फासावर चढवा

Last Updated: Thursday, July 26, 2012, 11:54

‘गुजरात दंगलीसाठी मी दोषी असेल तर मला फासावर चढवा’, असं वक्तव्य केलंय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी. एका वर्तमानपत्राला मुलाखत देत असताना मोदींनी हे वक्तव्य केलंय.