Last Updated: Friday, February 22, 2013, 14:04
www.24taas.com, नवी दिल्ली बीजेपी नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्याला दहशतवाद्यांकडून धमकीचे फोन येत असल्याचं म्हटलंय तसंच त्यांनी यावेळी नक्वी यांनी केंद्र सरकारकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणीही केलीय.
संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याला फाशी दिल्यानंतर आपल्याल धमकीचे फोन येत असल्याचं नक्वी यांचं म्हणणं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आपल्याला सुरक्षा पुरविण्याची मागणी केलीय.
याआधी, भाजपनं केंद्र सरकारवर अफजल गुरुला उशीरा फाशी देण्यात दिरंगाई केली, असा आरोप करत जोरदार टीका केलीय. अफजल गुरुला १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यातील सूत्रधार म्हणून फाशीची सजा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याची दया याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याला दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये फासावर चढवण्यात आलं होतं तिथंच त्याचा दफनविधीही पार पाडण्यात आला.
First Published: Friday, February 22, 2013, 14:04