आज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण Republic Day parade to showcase military might, cultu

आज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण

आज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...

६५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलंय. ध्वजारोहणानंतर इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीपासून परेडला सुरु होईल. इथं पंतप्रधान आधी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी भारतीय सामर्थ्यांचं दर्शन साऱ्या जगापुढं दाखवलं जाईल.

यंदा परेडचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे लढाऊ तेजस विमान. याशिवाय एमबीटी अर्जुन, अस्त्र आणि हेलिना नावाचे अण्वस्त्र तसंच टी-९० भीष्म यासारखे भारतीय सैन्याचे शान असलेल्या गोष्टी परडेमध्ये पाहता येणार आहेत... भारतीय सैन्याची ताकद दाखवल्यानंतर राजपथावर विविध चित्ररथ सादर केले जातील.. दरवर्षी २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड सोहळ्यात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत विविध राज्यांची संस्कृती आणि वैशिष्ट्य दाखवणारे चित्ररथ प्रदर्शित केले जातील..

यंदा या परेडमध्ये १८ राज्ये आपली संस्कृती, कला, ऐतिहासिक ठेवा आणि प्रगतीचे दर्शन या चित्ररथांमधून घडवतील...यंदा परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून जपानचे पंतप्रधान शिंजो हे आहेत.

महाराष्ट्राचा चित्ररथ

राजपथावरील आम्ही हाव जातीचे कोली हे सूरही घुमणार आहेत.. कारण महाराष्ट्राच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण चित्ररथाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. राज्याला लाभलेला सातशे किमीचा सागरी किनारा, मासेमारी आणि नारळी पौर्णिमा सणाचे वैशिष्ट्य या चित्ररथातून मांडण्यात येणार आहे... जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या बावीस कलाकारांनी हा चित्ररथ साकारलाय.. त्यामुळं राजपथावर कोळीनृत्याची खास झलक साऱ्यांना पाहता येणार आहे...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 26, 2014, 08:36


comments powered by Disqus