Last Updated: Sunday, January 26, 2014, 13:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगला. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर करण्यात आली.
नौदल, हवाईदल आणि लष्कराचे जवानही यामध्ये सहभागी झाले. त्यामुळे हवाईदलाच्या दिमाखदार कसरती, युद्धनौकांच्या प्रतिकृतींचं मुंबईकरांना दर्शन घडलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी १० हजार जणांची आसनव्यवस्था करण्यात आली होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मरीन ड्राईव्हवर पहिल्यांदाच होणारी ही परेड पहाण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून नागरीकांनी गर्दी केली होती.
राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मरिन ड्राइववर ध्वजारोहण केलं. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून या वेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. संचलनात सहभागी झालेले वायुदल, सेनादल, नौदल आणि पोलीस दलाकडून राज्यपालांनी मानवंदना स्वीकारली.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अभिनेता सलमान खान उपस्थित होता.
मुंबई पोलीस दलातर्फे मोटार सायकलींच्या चित्तथरारक कवायतींनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आदिवासी संस्कृतीचे मनोहारी दृष्य यावेळी पाहायला मिळाले. दीडशेहून अधिक ढोल, १०० लेझिम आणि ४० इतर वाद्यांसह आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 26, 2014, 13:48