सपाच्या सायकलवरून निवडणूक लढविणार राजू श्रीवास्तव, Riding on bicycles soft Raju Srivastava to contest elections

सपाच्या सायकलवरून निवडणूक लढविणार राजू श्रीवास्तव

सपाच्या सायकलवरून निवडणूक लढविणार राजू श्रीवास्तव
www.24taas.com,कानपूर

प्रसिद्ध कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तव आता राजकीय मैदानात आपले रंग दाखवणार आहे. चुटके आणि विनोद सांगून हसविणारा राजू श्रीवास्तव लोकसभा निवडणूक लढविणार आहे. समाजवादी पार्टीने राजूला उमेदवारी निश्चित केली आहे.

आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तवचा समावेश आहे. कानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तो कानपूरमधून लोकसभा निवडणूक लढवेल हे निश्चित झाले आहे.

याआधी राजू हा काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त होते. आता राजू समाजवादीकडून लोकसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलायमसिंग यादव यांच्या सायकलवरून राजू लोकसभेत जातो काय, हे पुढील निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. राजूने बिग बॉस, कॉमेडी सर्कस, लॉफ इंडिया लॉफ आदी टीव्ही कार्यक्रमात काम केले आहे.

First Published: Wednesday, February 13, 2013, 17:51


comments powered by Disqus