चौकीदाराचा पगार २२ हजार, संपत्ती २२ कोटी रुपये!Rs 22 crore treasure found in Lokayukta raid at PWD g

चौकीदाराचा पगार २२ हजार, संपत्ती २२ कोटी रुपये!

चौकीदाराचा पगार २२ हजार, संपत्ती २२ कोटी रुपये!
www.24taas.com, वृत्तसंस्था, इंदूर

मध्यप्रदेशच्या इंदूरमधील लोकायुक्तांनी घातलेल्या छाप्यात हजारोंचा पगार घेणारा लोकनिर्माण विभागाचा चौकीदार कोट्यधीश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या चौकीदाराचा एकूण पगार २२ हजार रुपये असून त्याची संपत्ती तब्बल २२ कोटी आहे.

लोकायुक्त पोलीस पथकानं शुक्रवारी सकाळी चौकीदार गुरू कृपाल सिंह यांच्या टिळकनगर इथल्या घरावर छापा टाकला. या छाप्यात सिंह या चौकीदाराकडे १४ घरं, २० एकर जमीन, १५ लाखांचं सामान असल्याची माहिती मिळाली. शिवाय अनेक ठिकाणी भूखंड असल्याचे कागदपत्रही पोलिसांना सापडले.

मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिनेही गुरू कृपाल सिंहच्या घरी सापडले. पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. शुक्रवारी सकाळी जेव्हा लोकायुक्तांचं पथक सिंह यांच्या धरी पोहोचले तेव्हा त्यानं दरवाजा उघडला नाही. दार उघडण्यासाठी लोकायुक्तांना खूप मशक्कत करावी लागल्याची माहितीही सांगण्यात आलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 7, 2014, 19:04


comments powered by Disqus