Last Updated: Tuesday, May 14, 2013, 15:44
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली बॉलिवूडमधील दबंग सलमान खान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आता नव्या वादात अडकल्या आहेत. या वादाचे काय पडसाद उमटतात याचीच चर्चा सुरू आहे.
दिल्लीतील गँगरेपनंतर महिलांबद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलावा यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. अश्लिलतेच्या मुद्यावरुन नवा आरोप करण्यात आलाय. सल्लूच्या नव्या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या गाण्याने सलमान आणि शीला दीक्षित वादात सापडल्यात.
सलमानचा नवा चित्रपट `दबंग २` मध्ये अश्लिलता पसरविणारे गाणे असल्याचा आरोप केला गेला आहे. या प्रकरणी त्याचासह सात जणांवर खटला दाखल करण्यात आला आहे.
गँगरेपप्रकरणी लोकांच्या रोषाला तोंड देत शीला दीक्षित एका व्हिडिओमुळे अडचणीत आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री दीक्षित या वादग्रस्त रॅप गायक हनीसिंग सोबत थिरकताना दिसत आहेत. त्यांचा नाच गाण्याचा व्हिडिओ ऑक्टोबर २०१२ मधील आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 15:44