Last Updated: Sunday, December 8, 2013, 14:10
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपची `झाडू`च कारणीभूत ठरली. आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर, अरविंद केजरीवाल.