नवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!, Samajwadi Party leader`s wife shot by his female friend

नवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!

नवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
लखनऊमधील इस्माइलगंज भागातील प्रॉपर्टी डिलर आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता बबलू सिंह यांच्या पत्नीची घरात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. बबलू यांची पत्नी दीपा हिची मैत्रीण सुमन हिने दारूच्या नशेत दीपाला गोळ्या झाडून ठार केले.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमन हिला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी घटनास्थळावरून पळालेल्या शिवम नावाच्या दुसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी विपीन यांचा शोध सुरू आहे. तिघांविरोधात हत्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इस्माइलगंज येथे राहणाऱ्या बबलू सिंह याला पहिली पत्नी मीनाकडून मूल नसल्याने त्याने दीपा सिंह (३५) हिच्याशी दुसरे लग्न केले. दीपा आणि बबलूला दोन मुले झाली. दीपाची मैत्री शहवाजपूरची ग्राम प्रधान आणि समाजवादी पक्षाची कार्यकर्ता सुमन सिंह हिच्याशी होती.

सुमनही प्रॉपर्टी डिलिंगचे कामे करत होती. त्यामुळे दीपाच्या घरी तिचे येणे जाणे होते. त्यामुळे बबलू आणि सुमन यांच्या जवळीकता वाढली. दीपाला ही गोष्ट कळली. तिने सुमनला घरी येण्यापासून मज्जाव केला. सोमवारी रात्री सुमन आपला पुतण्या विपीन आणि त्याचा मित्र शिवमसह बबलूच्या घरी पोहचली. रात्री प्रकरण हामरी तुमरीवर आले. सकाली दीपा आपल्या कुटुंबासाठी नाश्ता बनवत असताना सुमनने दीपाच्या पोटात दोन गोळ्या झाडल्या.

दीपाचा मृतदेह पाहिला तेव्हा पोलिसांना त्याच्यावर हल्ला झाल्याचे लक्षात आले. दीपाचे कपडे फाटले होते. तिच्या शरिरावर काही जखमाही आढळून आल्या.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 29, 2014, 14:04


comments powered by Disqus