सेक्स रॅकेट : बारमध्ये आमदाराला सहा कॉलगर्लसह अटक, Samajwadi Party MLA arrested with call girl in Goa

सेक्स रॅकेट : बारमध्ये आमदाराला सहा कॉलगर्लसह अटक

सेक्स रॅकेट : बारमध्ये आमदाराला सहा कॉलगर्लसह अटक
www.24taas.com , झी मीडिया, पणजी

उत्तर प्रदेशमधला समाजवादी पक्षाचा आमदार महेंद्र कुमार सिंहला गोव्यात सहा कॉलगर्लसह अटक करण्यात आलीय. गोवा पोलिसांनी पणजीतल्या व्हिवा गोवा हॉटेलवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

यामध्ये महेंद्र प्रताप सिंहसह सहा जणांना अटक करण्यात आलीय. या सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. महेंद्र कुमार सिंह हे उत्तर प्रदेशमधल्या सीतापूरचे आमदार आहेत. आमदार सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडला गेल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिकमधील चोपड्याच्या माजी विधान परिषदेच्या आमदाराच्या वर्सोवातल्या घरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. काल रात्री मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेनं वर्सोवा मधील न्यू म्हाडा वसाहतीतल्या इमारत नंबर दोनच्या राजयोग सोसायटीच्या रूम नंबर ३०२ येथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाच मुलींसह सुप्रीया ठाकूर आणि सतीश शहा या दोन दलालांसह अटक केलीय.

अटक केलेल्या तरुणी या सिरीअल आणि चित्रपटांमध्ये काम करणा-या असल्याचं तपास अधिका-यानं सांगितलय. या इमारतीत अनेक आमदारांची घरं असून आणखी कुठल्या आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट सुरु होतं का याचा तपास पोलीस करतायेत. याआधीही वर्सोवा येथील पोलीस अधिकार्यांच्या घरात सुरु असलेलं सेक्स रॅकेट उघडकीस आलं होतं.

First Published: Wednesday, August 28, 2013, 09:30


comments powered by Disqus