चोपड्याच्या माजी आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट, sex racket in mumbai, nashik EX MLA house been used

चोपड्याच्या माजी आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट

चोपड्याच्या माजी आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चोपड्याचे विधानपरिषदेचे माजी आमदाराच्या वर्सोवा येथील घरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

काल रात्री मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं वर्सोवा मधील न्यू म्हाडा वसाहतीतील इमारत नंबर दोन राजयोग सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ३०२ येथे छापा टाकून पाच मुलींसह सुप्रिया ठाकूर आणि सतिश शहा या दोन दलालांसह अटक केलीये.

अटक केलेल्या तरुणी या सिरीअल आणि चित्रपटांमध्ये काम करत असल्याचं तपास अधिकाऱ्यानं सांगितलय.

या इमारतीत अनेक आमदारांची घर असून आणखी कुठल्या आमदाराच्या घरात सेक्स रॅकेट सुरु होतं का याचा तपास पोलीस करतायेत. याआधीही वर्सोवा येथील पोलीस अधिकार्यांच्या घरात सुरु असलेलं सेक्स रॅकेट उघडकीस आणलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 21:14


comments powered by Disqus