Last Updated: Wednesday, May 29, 2013, 15:47
www.24taas.com, झी मीडिया, चंदीगड पंजाब सरकारनं सरबजीतची मुलगी स्वप्नदीप कौर हिला नायब तहसीलदार या पदावर रुजू करून घेतलंय.
पंजाब मंत्रिमंडळानं दया दाखवत मंगळवारी अनुकंपा तत्त्वाच्या आधारावर स्वप्नदीप कौर हिला नायब तहसीलदार पदावर नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिलीय.
यासोबतच ‘मोगा’ भागाजवळच्या एका रोड अपघातात आपल्या परिवारातील ११ सदस्यांना गमावणाऱ्या मनजीत कौर हिलाही जिल्हा उपायुक्त कार्यालयात चतुर्थ श्रेणी नोकरी देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आलीय.
सरबजित सिंह यांच्यावर पाकिस्तानातील एका जेलमध्ये कैद्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. पंजाब सरकारनं सरबजीतला राष्ट्रीय शहीदाचा दर्जा दिला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 29, 2013, 14:01