Last Updated: Friday, June 14, 2013, 16:24
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली मोदी हे काँग्रेससाठी आव्हान ठरतील, या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झालंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी यावर जयराम रमेश यांना काँग्रेसचा राजीनामा देऊन मोदींच्याच पक्षात जाण्याचा सल्ला दिलाय.
‘नरेंद्र मोदी आमच्यासाठी आव्हान आहेत. त्यांच्याकडे केवळ प्रशानकीय क्षमता नसून ते एका विचारधारेचं नेतृत्व करतात. ते उत्तम निवडणूक मॅनेजर आहेत. त्यांनी गुजरातमध्ये तीन निवडणुका जिंकत आपली क्षमती सिद्ध केलीय. पण, काँग्रेसला मोदींपासून कोणताही धोका नाही’असं जयराम रमेश यांनी म्हटलं होतं. काँग्रेसचे थिंक टँक’मधले महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं अन्य काँग्रेस नेत्यांसोबतच अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
महत्त्वाचं म्हणजे, या काँग्रसच्या या पहिल्याच धुरंधर नेत्यानं मोदींना आव्हान म्हणून स्वीकारलंय. याअगोदर काँग्रेस पक्षानं मोदींना फार महत्त्व दिलं नव्हतं. मोदींचा प्रभाव केवळ गुजरातपुरता सीमित असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 14, 2013, 16:11