सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणारSavarkar`s message again display in Andaman Jail, Modi ca

सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणार

सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अंदमान इथल्या सेल्युलर कारागृहात उभारण्यात आलेल्या `स्वातंत्र्य ज्योत` स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेशफलक पुन्हा बसवण्यास केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मान्यता दिलीय.

यूपीए सरकारच्या राजवटीत तत्कालिन मंत्री मणीशंकर अय्यर यांनी सावकरांचा हा संदेशफलक काढून टाकला होता. आता माजी मंत्री राम नाईक आणि भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मागणीनुसार सावकरांचा हा संदेशफलक पुन्हा बसवण्यात येणार आहे. सेल्युलर जेलमधील सावरकरांच्या पुतळ्याजवळ लवकरच हा संदेशफलक पुन्हा लावण्यात येईल, अशी माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे. त्यानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यातच मोदी सरकारनंही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 28, 2014, 20:50


comments powered by Disqus