मुलींना अटक केलीच कशी? - कोर्टानं विचारला जाब, SC acts on Facebook arrests, issues notices

मुलींना अटक केलीच कशी? - सुप्रीम कोर्टानं विचारला जाब

मुलींना अटक केलीच कशी? - सुप्रीम कोर्टानं विचारला जाब
www.24taas.com, नवी दिल्ली

पालघर फेसबुकप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला चांगलच फटकारलयं. पालघरच्या तरुणींना का अटक केली? असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला विचारलाय.

सुप्रीम कोर्टानं आयटी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि महाराष्ट्रासह सहा राज्यांनाही नोटीस पाठवली आहे. आयटी अॅक्टची गरज काय? हा अॅक्ट काढून टाकू नये काय? असा सवालही कोर्टानं राज्यांना आणि केंद्राला विचारलाय. शिवाय या प्रकरणात संबंधितांनी सहा आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत.

पालघरच्या शाहिन आणि तिची मैत्रिण रेणू या दोन मुलींना १८ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी केलेल्या वादग्रस्त मजकुराबद्दल पोलिसांनी अटक केली होती. याबद्दलच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी अल्तमस कबीर आणि न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांच्या खंडपीठानं महराष्ट्र सरकारला जाब विचारलाय. चार आठवड्यांच्या आत याचं उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिलेत.

First Published: Friday, November 30, 2012, 14:14


comments powered by Disqus