तृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णयSC recognises transgenders as third gende

तृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

तृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सुप्रिम कोर्टानं तृतीय पंथीयांसाठी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. तृतीयपंथींयांना थर्ड जेंडर म्हणून सुप्रिम कोर्टानं मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी तृतीय पंथीयांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात असे आदेशही न्यायालयानं दिलेत. तृतीयपंथीयांना लिंग दर्जा देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या लक्ष्मी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. `न्यायालयाच्या निकालामुळं फारच आनंद झाला,भारताची नागरिक असल्याचा अभिमान आहे,` अशी प्रतिक्रिया लक्ष्मी त्रिपाठी यांनी दिली

तृतीय पंती हे सामाजिक दृष्टा मागासलेले आहेत असही न्यायालयानं नमूद केलं आहे. तृतीयपंथी हेही या देशाचे नागरिक असून त्यांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक मान्यता मिळवण्याचा समान अधिकार आहे असं न्यायालयानं लक्षात आणून दिलयं. तृतीयपंथीयांवर होणारे अत्याचार. त्यांना मिळणारी भेदभावाची वागणूक याबाबत सर्वोच्य न्यायालयानं काळजी व्यक्त केली आहे. देशभरात १९ लाख तृतीयपंथी असून, या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 14:14


comments powered by Disqus