मुंबईत खोट्या प्रतिष्ठेपायी तरुणानं गमावला जीव

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:29

खोट्या प्रतिष्ठेपायी हत्या होण्याचा प्रकार भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत घडलाय. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय.

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देणार

Last Updated: Monday, June 9, 2014, 20:19

राज्यातील लिंगायत समाजाला भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.

लेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499!

Last Updated: Sunday, June 8, 2014, 12:05

लेनोव्हानं आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार ए सीरिज टॅबलेट A7-50 बाजारात आणलाय. हा भारतात कंपनीच्या डू स्टोअरला उपलब्ध असेल. लेनोव्हाचा हा टॅबलेट सिंगल सिमवर काम करतो. यात व्हॉइस कॉलिंग हे महत्त्वाचं फीचर आहे.

खोट्या प्रतिष्ठेखातर गर्भवती महिलेची दगडानं ठेचून हत्या!

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 15:56

पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी...

नगर ‘हॉरर’ किलिंग : नितीनला न्याय मिळणार?

Last Updated: Friday, May 2, 2014, 23:06

वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.

`हॉरर` किलिंग प्रकरण; दलित तरुणाची हत्या

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 21:32

बहिणीचे दलित तरुणासोबत प्रेमसंबंध मान्य नसल्यानं भावानं 17 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं घडलाय.

क्रिकेटमधला लाजीरवाणा आणि गंमतीशीर विक्रम

Last Updated: Monday, April 28, 2014, 12:35

क्रिकेटमधील एक लाजीरवाणा विक्रम इंग्लिश क्लब क्रिकेटमध्ये खेळतांना व्हायरल-सीसी टीमने केलाय. हॅस्लिंगट टीम विरोधात खेळतांना व्हायरल-सीसीने अवघ्या तीन धावात आपला डाव गुंडाळलाय.

तृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 14:14

सुप्रिम कोर्टानं तृतीय पंथीयांसाठी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. तृतीयपंथींयांना थर्ड जेंडर म्हणून सुप्रिम कोर्टानं मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी तृतीय पंथीयांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात असे आदेशही न्यायालयानं दिलेत. तृतीयपंथीयांना लिंग दर्जा देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

जनावरांच्या सोनोग्राफी मशिनमधून गर्भलिंग निदानाचा धोका!

Last Updated: Monday, April 14, 2014, 15:26

जनावरांच्या आजारावर उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी मशीनमधून महिलेच्या गर्भातील मुलगा-मुलगी निदान करणं शक्य असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळं पशुवैद्यकीय रुग्णालयांमधील सोनोग्राफी मशीनवर पीसीपीएनडीटी पथकाकडून वॉच ठेवण्यात येतोय. सोबतच पशुवैद्यकीय रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार नोंदणीकृत करण्यात आले आहेत.

खूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!

Last Updated: Monday, April 7, 2014, 21:27

त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.

धक्कादायक... प्रियकराचं लिंग कापण्यासाठी दिली सुपारी

Last Updated: Monday, April 7, 2014, 19:55

एखाद्या दुखावलेल्या महिलेपेक्षा कोणी जास्त धोकादायक नसतं हे पुराणकाळापासूनच बोललं जातंय. असाच काहीसा धक्कादायक प्रकार ब्राझिलमध्ये घडला. एका माणसाला महिलेसोबत लग्न मोडण्याचा निर्णय चांगलाच महागात पडला. त्याला त्याचा प्रायव्हेट पार्ट त्यामुळं गमवावा लागलाय.

वर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका

Last Updated: Sunday, April 6, 2014, 22:24

वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामने

हॉरर किलिंग : बहिणीला ट्रॅक्टरखाली चिरडलं

Last Updated: Saturday, March 15, 2014, 15:49

बहिणीनं प्रेमविवाह केल्याचा मनात ठेऊन तिच्या चिमुकल्या मुलीसमोरच तिला भावानंच ट्रकखाली चिरडून ठार केलंय. ही धक्कादायक घटना घडलीय जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात...

पाकला धूळ चारत श्रीलंकेनं जिंकला आशिया कप

Last Updated: Sunday, March 9, 2014, 07:50

लाहिरु थिरिमन्नेच्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर श्रीलंकेनं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करत आशिया चषकावर आपलं नाव कोरलंय. मिरपूरच्या या सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेला विजयासाठी २६१ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.

`व्हॉटसअप`वर करा `फ्री व्हॉईस कॉलिंग`

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 09:42

नुकतंच, फेसबुकनं तब्बल १९ बिलियन डॉलरला खरेदी केलेलं चॅटींग अॅप्लिकेशन व्हॉटसअप आता एका नव्या फिचरवर कामाला लागलंय. यामध्ये तुम्हाला आता फक्त चॅटींगचीच नाही तर `फ्री व्हॉईस कॉल`चीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

मॅक्क्युलम आणि वाटलिंगची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप

Last Updated: Monday, February 17, 2014, 10:05

न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्क्युलम आणि विकेटकीपर बीजे वाटलिंग यांनी कसोटी सामन्यात भागीदारीचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

वेलिंगटन कसोटी : भारतीय बोलर्सना विकेटचा शोध

Last Updated: Monday, February 17, 2014, 08:36

कर्णधार बँडन मॅक्क्युलम आणि विकेट कीपर बीजे वाटलिंगने वेलिंगॉन कसोटीत, लंच ब्रेकपर्यंत भारताला एकही विकेट मिळू दिलेली नाही. वेलिंगटन कसोटीचा आज चौथा दिवस आहे.

`त्या` बेकायदेशीत गर्भपाताबद्दल डॉ. गोरे अडचणीत

Last Updated: Saturday, February 8, 2014, 09:14

नाशिकमध्ये अनधिकृतपणे गर्भपातप्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉ. गोरे आता अडचणीत आलेत. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतलीय. असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमीटीही बुचकळ्यात पडलीय.

तिच्या हिमतीनं गुन्हा उघड, पण कारवाई...

Last Updated: Friday, February 7, 2014, 12:54

लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत राज्य शासनानं कठोर पाऊल उचललं मात्र तरीही नाशिक शहरात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याच समोर आलंय. गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत शंका आहे.

मुंबईकर सण्डेनंतर `मोनो डार्लिंग`ला विसरले

Last Updated: Monday, February 3, 2014, 15:38

मुंबईकरांनी संडे पाहून मोनोडार्लिंगची भेट घेतली, वेळआधी जाऊन मोनोडार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. मोनोडार्लिंगला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.

समलैंगिक संबंध गुन्हाच- सुप्रीम कोर्ट

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:22

सुप्रीम कोर्टात समलैंगिक संबंध गुन्हा ठरविण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची याचिका कोर्टानं फेटाळून लावलीय.

सुप्रीम कोर्ट `समलिंगी` जोडप्यांना दिलासा देणार?

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 11:36

समलिंगी संबंधाबाबत महत्त्वाचा कायदेशीर निर्णय आज होणार आहे. भारतामध्ये `गे रिलेशन` म्हणजेच समलिंगी संबंध हा गुन्हा असणार की नाही? याबाबत आणि पुढील कायदेशीर लढाईबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे.

नांदेडमध्ये हॉरर किलिंग, उशीनं तोंड दाबून केली मुलीची हत्या

Last Updated: Sunday, January 12, 2014, 09:22

नांदेडमध्ये हॉरर किलिंगचा प्रकार उघड झालाय. आई वडिलांनीच लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या मुलीचं एका तरुणावर प्रेम होतं. मात्र तिच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. याच विरोधातून या दोघांनी तिची हत्या केली. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केलीय.

रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 17:44

सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच. सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.

मंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं...

Last Updated: Sunday, January 5, 2014, 10:36

दहिसरच्या आनंदनगर परिसरातील विट्ठल मंदिरात झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उलगडा केलाय.

वासनांध पुरूषांना सणसणीत कानाखाली... देख ले

Last Updated: Friday, December 20, 2013, 11:26

कोणतीही महिला आपली प्रॉपर्टी असल्यासारखे बहुतांशी पुरूष स्त्रीयांकडे पाहत असतात. त्याच्या सणसणीत कानाखाली मारावीशी महिलांना वाटते.

सचिनची विकेट काढणाऱ्या शिलिंगफोर्डच्या खेळण्यावर बंदी!

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 11:20

नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय.

सौरव गांगुली होणार क्रीडा मंत्री, भाजपची ऑफर!

Last Updated: Saturday, December 14, 2013, 17:05

माजी भारतीय कॅप्टन सौरव गांगुली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदारकीसाठी उभं राहण्याची शक्यता आहे.

समलिंगी संबंध : ‘प्रेम हा गुन्हा कसा होऊ शकतो?’

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 22:49

समलिंगी संबंध गुन्हेगारी कृत्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रमी कोर्टानं दिलाय. दिल्ली हायकोर्टानं समलिंगी संबंधांच्या बाजुनं दिलेला २००९चा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलाय.

शिलिंगफोर्डनं घेतला सचिनचा बदला!

Last Updated: Thursday, November 7, 2013, 11:09

कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरू असलेली वेस्ट इंडिज विरुद्ध भारताची टेस्ट मॅचची उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती... पण,

टीम इंडियात कमी तिथे `शमी`!

Last Updated: Thursday, October 24, 2013, 21:08

पावसात वाहून गेलेल्या रांची वन-डेमुळे टीम इंडियाचं नंबर वन स्थान अबाधित राहिलं असलं. तरी टीम इंडियासाठी रांची वन-डेत आणखी एक चांगली बातमी मिळाली ती मोहम्मद शमीच्या रूपात...

बॉलिवूडच्या बादशहानं चोरलं हॅरी पॉटरच्या लेखिकेचं भाषण?

Last Updated: Monday, October 7, 2013, 13:22

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खाननं हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिचं भाषण चोरल्याचा आरोप होतोय. शाहरुखनं ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात केलेलं भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

हॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 10:05

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

विवाहित महिलेला लग्नासाठी हवीय मुलगी!

Last Updated: Saturday, September 7, 2013, 17:52

पाकिस्तानात एका विवाहित महिलेला लग्न करायचंय... आणि यावेळेस ती एका मुलीच्या शोधात आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय का? पण, हो हे खरं आहे.

शिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या

Last Updated: Monday, July 29, 2013, 20:12

शिर्डीत एकाच महिन्यात 6 भिका-यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. एकाच महिन्यात झालेल्या या हत्येमागे सीरियल किलरचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!

Last Updated: Saturday, July 20, 2013, 18:06

दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.

अमरनाथचं बर्फाचं शिवलिंग पूर्णत: वितळलं!

Last Updated: Monday, July 15, 2013, 13:36

अमरनाथ यात्रा सुरू झालीय. अजूनही एक महिन्याची यात्रा बाकी असतानाच अमरनाथचं पवित्र शिवलिंग विरघळलंय.

कट्टर मुस्लिम धर्मियांसाठी `हलाल गुगलिंग`

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 16:19

कट्टर इस्लाम पाळणाऱ्या मुस्लिमांसाठी गुगलने ‘हलाल गुगलिंग’ हे नवं सर्च इंजिन लाँच केलं आहे. इस्लाम संस्कृती टिकवता यावी, यासाठी हे ‘मुस्लिम स्पेशल’ सर्च इंजिन डेव्हलप करण्यात आलं आहे.

`जात पंचायती`च्या दबावानं घेतला `ती`चा बळी!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:09

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली ‘ऑनर किलिंग’ची घटना ही जातपंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक सर्वज्ञात ‘सत्य’ आता उघडपणे समोर येतंय.

वडिलांनीच गरोदर मुलीचा गळा घोटला

Last Updated: Friday, June 28, 2013, 15:25

नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलेय. वडिलांनीचे आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती.

जय केदारनाथ

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 23:50

महाप्रलयापुढे झुकली नाही भाविकांची श्रद्धा ! चारधाम यात्रेचा महिमा मोठा ! भोलेनाथाच्या दर्शनाची भक्तांना ओढ !

असंगाशी संग, मित्राने कापलं मित्राचं लिंग!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 16:40

पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.

आता मोबाईलवर फ्री सर्व्हीस

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 14:05

आपण मोबाईल वापरत आहात, तर तुम्हाला मोफत काय काय मिळेल, याची माहिती नसेल तर...हे तुमच्यासाठी. मोबाईल वापर ही आजची गरज बनली आहे. मोबाईलमुळे आपल्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सोपा उपाय आहे. मोफत अॅप्समुळे ते शक्य झाले आहे.

बॉलिवूड, स्ट्रगलिंग अभिनेत्री, स्पॉटबॉय आणि बलात्कार!

Last Updated: Friday, March 1, 2013, 13:03

आपण सिनेमा फायनान्सर असल्याचं भासवत स्पॉटबॉयनंच एका ‘स्ट्रगलिंग’ अभिनेत्रीवर बलात्कार केलाय.

भारतीय अभियंत्याचा सिंगापूर स्फोटात मृत्यू

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 17:15

सिंगापूरमध्ये झालेल्या स्फोटात एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाला. जुरॉग बेटावर बांधकाम सुरू असताना हा स्फोट झाला.

समलिंगी जोडप्यांच्या विवाहासाठी रस्त्यावर प्रदर्शनं

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 12:51

समलिंगी जोडप्य़ांच्या विवाहाला मान्यता देण्याच्या प्रस्तावाचं समर्थन करण्याठी पॅरिसमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत प्रदर्शनं केली....

तणाव घालविण्यासाठी `जादू की झप्पी`

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 16:53

आपल्याला टेंशन आलेय का? नेहमी तणावाचा सामना करावा लागतोय का? तुम्ही चलबिचल आहात का? तुमची शांतता भंग पावलेय का? यावर एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे `जादू की झप्पी` (प्रेमाने मिठ्ठी मारणे)

`खाप पंचायतींना निर्णयाचा अधिकार दिलाच कुणी?`

Last Updated: Monday, January 14, 2013, 18:35

खाप पंचायतींना फर्मान सुनावण्याचा आणि वेगवेगळे नियम लागू करण्याचा अधिकार दिलाच कुणी, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.

मित्राने समलिंगी संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने खून

Last Updated: Thursday, December 27, 2012, 15:04

सुरूवातीला साध्या गप्पा मारणाऱ्या रायनने नंतर आलेकसोबत शारीरिक चाळे करण्यास सुरूवात केली. आलेकने विरोध दर्शवताच रायनने आलेकला मारहाणही केली.आपला बचाव करण्यासाठी आपण रायनचा खून केल्याचं आलेकने म्हटलं आहे.

पुण्यामध्ये समलिंगींचा मोर्चा

Last Updated: Sunday, December 9, 2012, 22:41

आज एक आगळावेगळा मोर्चा पुणेकरांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. गे, लेस्बियन, इंटरसेक्स, तृतीय पंथीय अशा समाजात वेगळ्या समजल्या जाणाऱ्या लोकांनी हा मोर्चा काढला.

डॉ. सरस्वती मुंडेला जामीन मंजूर

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 13:44

बीडमधल्या विजयमाला पट्टेकर मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. सरस्वती मुंडेंला सशर्त जामीन मंजूर झालाय. तीन लाखांच्या जातमचुलक्यावर अंबाजागोई सत्र न्यायालयानं सरस्वती मुंडेंला जामीन मंजूर केलाय.

लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश

Last Updated: Thursday, August 23, 2012, 12:10

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. `लेक लाडकी` अभियानांतर्गत वर्षा देशपांडेंच्या सहकार्याने हा पर्दाफाश करण्यात आला.

सोनोग्राफी सेंटर्सनं पुकारला बेमुदत बंद

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 15:19

औरंगाबादेत प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ सोनोग्राफी सेंटर्सने बेमुदत बंद पुकारलाय.

सरकारी दवाखान्यातच गर्भलिंग निदान

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 20:29

राज्यात बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर्सची चौकशी सुरू आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातच गर्भलिंग निदान होत असल्याची बाब समोर आलीये. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णालयात सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन न बसवल्यामुळे हा प्रकार होत होता.

अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी...

Last Updated: Saturday, June 30, 2012, 17:05

आपण करत असलेली अनेक कामं सगळं व्यवस्थित असूनही काही वेळा पूर्ण होत नाहीत. कित्येक वेळा शेवटच्या क्षणी कामात अडथळा येतो. कधी कधी जे लोक आपल्या विरुद्ध असतात, त्यांच्यावरच आपलं काम अवलंबून असतं.

मुलींचा जीव घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 08:42

बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आलाय. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. यावेळी इथं गर्भलिंगनिदान करण्यासाठी आलेली रुग्णही सापडली आहेत.

पिंकी प्रामाणिकचे झाले लिंग परीक्षण!

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 19:16

बलात्कार आणि पुरूष असल्याची आरोपी असलेल्या आशिया खेळात सुवर्ण पदक जिंकणारी पिंकी प्रामाणिकचे मंगळवारी लिंग निर्धारण परीक्षण करण्यात आले. पिंकीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठ़डीत तिची रवानगी करण्यात आली आहे.

सुवर्ण विजेती महिला खेळाडू निघाली 'बलात्कारी पुरूष'!

Last Updated: Friday, June 15, 2012, 00:02

अशियाई खेळांमध्ये २००६ साली सुवर्ण पदक जिंकलेली पिंकी प्रामाणिक भलतीच अप्रामाणिक असल्याचं समोर आलं आहे. पिंकी वास्तवात एक पुरूष असून तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका विधवा महिलेने केला आहे.

राज्यभरात सोनोग्राफी सेंटर्सवर धाड

Last Updated: Friday, June 8, 2012, 17:23

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर प्रशासनानं तातडीनं कामाला लागलंय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर्सवर धाड टाकली गेलीय. आज टाकलेल्या धाडींत धुळ्यात एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आलीय, तर जळगाव आणि नाशिकमध्ये अनेक सोनोग्रापी सेंटर्सना सील ठोकण्यात आलंय.

मनसे ब्लॅकमेंलिग करतेय- मुंबई महापौर

Last Updated: Monday, May 21, 2012, 23:21

मुंबई महापालिकेच्या शालेय विघार्थ्यांना देणात येणाऱ्या २७ मोफत वस्तूमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. पालिकेनं शालेय वस्तूंची खरेदी बाजार भावापेक्षा जास्त दरात केल्याची तक्रार मनसेन पालिका आयुक्त सिताराम कुंटेकडे केली आहे.

समलिंगी विवाह: काही गैर नाही - ओबामा

Last Updated: Thursday, May 10, 2012, 13:43

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.

'तो' अखेर ती' होणार.. लिंग बदलाला परवानगी

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:24

गुवाहाटीच्या २१ वर्षीय विधान बरुआला मुंबई हायकोर्टानं अखेर लिंगबदलाची परवानगी दिली आहे. राज्यात अथवा केंद्रात लिंग बदलण्याला विरोध करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही.

बदनामीसाठी फेसबुकवर बनवलं a/c ‘फेक’!

Last Updated: Sunday, April 29, 2012, 10:28

मैत्रीच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत नाही म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यानं सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खातं उघडून बदनामीचा प्रयत्न नागपूरात उघड झालाय. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केलीय.

राज ठाकरे यांच्या भेटीला सुभाष घई....

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 14:45

सिने दिग्दर्शक सुभाष घई हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. व्हिसलिंग वुडसप्रकरणी सुभाष घई अडचणीत आले आहेत. त्यासाठीच सुभाष घई राज यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतं आहे.

कलिंगड ठेवते हृदय निरोगी

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 15:57

तुमचे हृदय हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी आता जास्त काही करायचे नाही, केवळ कलिंगड खाण्यावर भर दिला म्हणजे झालं. कलिंगड खा आणि हृदय ठेवा निरोगी, असा मंत्र कलिंगडावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी दिला आहे.

समलिंगी संबंधाला सरकारने दर्शविला विरोध

Last Updated: Thursday, February 23, 2012, 14:12

समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या निवेदनात समलैंगिक संबंध अनैतिक असल्याचं म्हटलं आहे.

तो एक बॉल गेला कुठे ?

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 15:46

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे लढत 'टाय' झाली, पण श्रीलंकेचा बॉलर लसिथ मलिंगा याने ३०व्या षटकात सहाऐवजी पाच चेंडू टाकल्यामुळे भारतीय संघाची विजयाची संधी थोडक्यात हुकली असल्याचं म्हटलं जात आहे.

गर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास

Last Updated: Thursday, January 12, 2012, 21:45

बीडमध्ये गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी तीन डॉक्टारांना एक वर्ष तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल्सवर धडक कारवाई

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 12:36

वसई-विरार भागात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक हॉस्पिटल्समध्ये सोनोग्राफी मशीन आणि प्रसुतीचा रेकॉर्डच नव्हता.

गर्भलिंग चाचणी फक्त संस्था किंवा हॉस्पिटलमध्येच

Last Updated: Friday, November 18, 2011, 05:57

गर्भलिंग निदान चाचणी आणि त्यानंतर होणारे गर्भपात ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. यामुळेच आता गर्भलिंग निदान चाचणीसाठी हायकोर्टाने काही प्रमाणात पायबंद घालण्यास सुरवात केली आहे.गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा आणखी एक निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला.

लाकडी पुलाने घेतले ३१ बळी

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगपासून २६ किमी अंतरावर असलेल्या बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.