`तिसऱ्या अपत्याला जन्म द्या आणि महिना ५००० मिळवा`, scream for parsi community for gaining population

`तिसऱ्या अपत्याला जन्म द्या आणि महिना ५००० मिळवा`

`तिसऱ्या अपत्याला जन्म द्या आणि महिना ५००० मिळवा`

www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा

पारसी समुदायानं आपल्या समुदायाची संख्या वाढवण्यासाठी एक धक्कादायक योजना जाहीर केलीय. या योजनेनुसार, एक पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना मासिक भत्ता देण्यात येणार आहे. मुंबईच्या पारसी पंचायतीनं ही योजना जाहीर केलीय.

एकीकडे वाढती लोकसंख्या आणि प्रति व्यक्ती आवश्यवक जमीनीची कमतरता या अडचणीत देश सापडला असला तरी दुसरीकडे पारसी समुदायाला मात्र आपली जनसंख्या वाढवायचीय. पारश्यांची कमी संख्या लक्षात घेता या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्यांना जन्म देणाऱ्या दांम्पत्यांना मासिक भत्ता दिला जाणार आहे.

पारशी दांपत्याला दुसऱ्या अपत्यासाठी दरमहा तीन हजार रुपये आणि तिसऱ्या अपत्यासाठी दरमहा पाच हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. हा भत्ता अपत्याला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे. तर तिसऱ्या अपत्याला जन्म देणाऱ्या अपत्याला प्रति महिना ५००० रुपयांचा भत्ता मिळेल.

गुजरातमध्ये वलसाड येथे मुंबई पारशी पंचायतीच्या बैठकीत भत्त्यासंदर्भातला निर्णय झाला. या बैठकीला तीन हजार पारशी कुटुंबं उपस्थित होती. ही बैठक दरवर्षी ‘संजान दिवसा’च्या निमित्तानं आयोजित केली जाते. १२९७ वर्षांपूर्वी भारतात पारश्यांच्या आगमनानिमित्तानं हा दिवस साजर केला जातो. पारशी समाजाची लोकसंख्या वाढावी, या हेतूने भत्ता देण्याची योजना सुरू केली आहे, असं पंचायतीचे अध्यक्ष दिनशॉ मेहता यांनी म्हटलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 19, 2013, 18:23


comments powered by Disqus