पोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, sex racket busted in haryana

पोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
www.24taas.com, झी मीडिया, फरिदाबाद

बनावट ग्राहक पाठवून हरियाणाच्या फरिदाबाद सेन्ट्रल पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

सेक्टर १६-ए मार्केटजवळ पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सहा पुरुषांसहीत आठ तरुणींना अटक केलीय. कारवाई दरम्यान दोन गाड्याही जप्त करण्यात आल्यात. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. यामध्ये एका पोलिसानंच ग्राहकाची भूमिका बजावली. ग्राहक बनून हा पोलीस देहव्यापारातील एजंटसना भेटला. सौदा ठरला आणि या बनावट ग्राहकानं पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या कॉलगर्ल्स, दलाल आणि ग्राहकांनाही अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणी या फरिदाबादशिवाय बंगाल, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांतून आहेत. या तरुणींना कारमधून हॉटेलमध्ये पाठवलं जात होतं. तरुणींना ज्या परिसरातून अटक केली गेलीय याच भागात मोठ्या प्रमाणात देहव्यापार सुरु असल्याचंही आता समोर आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 18:37


comments powered by Disqus